अहमदनगर

नगर: नेवासा तालुक्यात वीज अंगावर पडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यु

अमृता चौगुले

नेवासा (नगर), पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील म्हसले येथे शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार २८ एप्रिल रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली.

शुक्रवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११:३० ते १२:१५ या वेळेत नेवासा तालुक्यात विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पाऊस सुरु होण्याच्या अगोदर घरातील लोकांसोबत शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या साई उर्फ बहीरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय १० वर्षे ) या इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्याचा मृत्युदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. या दुर्देवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT