अहमदनगर

कोपरगावात तापमान घसरले 8 अंशांपर्यंत

अमृता चौगुले

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुका परिसरात गेल्या चार दिवसांपासून गुलाबी थंडी पडली आहे. तापमानाचा पार 8 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत उतरला आहे. या गुलाबी थंडीत गोदावरीचे मनमोहक दृश्य सकाळ संध्याकाळ विलोभनीय दिसू लागले आहे. परिसरातील हे दृश्य अनेक जण आपल्या भ्रमणध्वनी मध्ये कैद करीत आहेत.

सकाळी- संध्याकाळी हे निसर्गरम्य वातावरण पाहून मन प्रसन्न होते. सकाळच्या सुमारास गोदावरी नदी परिसरात हे अनोख रूप अनुभवता येते. हे विलोभनिय दृश्य बघण्यासाठी सकाळी फिरणार्‍यांची मोठी गर्दी होत आहे. सोशल मीडियावर ते चांगलेच फिरत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT