अहमदनगर

राहुरी : अन् ‘प्रिन्स’ राहुरीत वकिलांसह हजर झाला

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयात नोकरी देण्याचा बनाव करुन अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा फंडा उघडकीस येताच सैराट फेम 'प्रिन्स'चे नाव गुन्ह्यात आले. शासकीय शिक्के तयार करण्यासाठी प्रिन्स उर्फ सुरज पवार याने शॉर्ट फिल्म बनविण्याचा बहाणा केल्याचे जवाब नोंदविण्यात आले होते. त्यामुळे प्रिन्सला अटक होणार का, याबाबत राज्यभर चर्चा गाजत असतानाच सैराट फेम प्रिन्स दोन वकिलांना घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाला.

याप्रकरणात राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली असताना सर्वत्र गाजलेल्या सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका साकारणार्‍या व राहुरी पोलिसांच्या रडारवर असलेला सूरज पवार आज हजर झाला. त्याचे दोन वकील सोबत होते. पोलिस उपनिरीक्षक सज्जन नरहेडा यांनी त्याची दिवसभर चौकशी केली. मात्र, या रॅकेटमध्ये आपला सहभाग असल्याचे सूरज पवारने स्पष्टपणे नाकारले आहे. या प्रकरणी अटकेत असलेले मित्र आहेत, एवढेच त्याने मान्य केले. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला घरी जाऊ दिले.

राहुरी तालुक्यातील खंडांबे येथील विजय बाळासाहेब साळे (वय 31) यास अटक केली आहे.नेवासा येथील महेश वाघडकर याने फिर्याद दिल्यानंतर मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळणारे दत्तात्रय क्षीरसागर, आकाश शिंदे व ओंकार तरटे या तिघांना अटक केली होती.

SCROLL FOR NEXT