अहमदनगर

जामखेड शहरामध्ये कडकडीत बंद पाळला

अमृता चौगुले

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवमानास्पद भाष्य केल्याप्रकरणी जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, बौद्ध महासभा, समस्त भीमसैनिक आदींतर्फे पुकारलेल्या जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जामखेडकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला.

यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, मोहन पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, सुरेश भोसले, वैजीनाथ पोले, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, शहर उपाध्यक्ष प्रा. राहुल आहिरे, प्रा. कुंडल राळेभात, ईस्माईल सय्यद, विकी सदाफुले, माजी सदस्य शहाजी राळेभात, सचिन शिंदे, विकास राळेभात, प्रशांत राळेभात, प्रकाश काळे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, उमर कुरेशी, प्रवीण उगले, मनोज भोरे, महेश निमोणकर, विकी घायतडक, अमोल लोहकरे, वसिम सय्यद, पवन राळेभात, अमित जाधव, दिगंबर ढवळे, बबन तुपेरे, महेश राळेभात, नरेंद्र जाधव, प्रदीप शेटे, संभाजी राळेभात, फिरोज बागवान, दिगांबर चव्हाण, संजय डोके, गणेश हगवणे समीर पठाण, आशोक आव्हाड, बाबा सोनवणे, कबीर घायतडक, माजी सरपंच शिवाजी ससाणे, सुरेखा सदाफुले, बबलू तुपेरे, सुरेखा सदाफुले, दीपक घायतडक आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT