अहमदनगर

कोपरगाव : काकडी ग्रामपंचायतीची वीज तत्काळ सुरू करा : स्नेहलता कोल्हे

अमृता चौगुले

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : काकडी ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करा, अशा सुचना भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिल्या. कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीत आज (सोमवारी) राहाता वीज वितरण कंपनीचे उपअभियंता डी. डी. पाटील यांच्या समवेत विजेच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मल्हारवाडी, डांगेवाडी, रांजणगाव देशमुख, बहादराबाद व मनेगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, विलास डांगे, भिमराज गुंजाळ, वाल्मीक कांडेकर, प्रमोद शिंदे, कानिफ गुंजाळ, अशोक गुंजाळ, बाबासाहेब सोनवणे, सुनिल कांडेकर, प्रकाश गोर्डे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

काकडी पंचक्रोशीत सध्या विजेच्या मोठ्या समस्या आहेत, त्यामुळे पुर्ण दाबाने वीज मिळत नाही. परिणामी वीज उपकरणे सुरळीत चालत नाहीत. स्नेहलता कोल्हे यांनी अनेक ठिकाणी असलेले विद्युत जोड बदलावे, कोर्‍हाळे वीज उपकेंद्र व काकडी विमानतळ अंतर्गत वीज प्रश्नांची सोडवणुक करावी. मनेगाव जि. प. प्राथमिक शाळा आवारातील वीज जोड बदलण्याच्या सूचना केल्या.

यावेळी काकडी विमानतळावरील टॅक्सी चालकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. काकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पूर्वा गुंजाळ यांनी प्रलंबित वीज समस्यांचा पाढा वाचला.

SCROLL FOR NEXT