अकोले : मुलीने मनाविरूद्ध जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी जावयाला बेदाम मारहाण करून त्याला झाडाला बांधून ठेवले. याप्रकरणी अस्मिता सकेंत लांडे (वय २१ रा. वाघापुर ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आई-वडिलांसह चुलत्याविरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जावाई संकेत म्हतु लांडे (वय २५) यांना मुलीच्या नातेवाईकांच्या तावडीतून सोडवत गोविंद पोपट औटी,बाळू पोपट औटी, रंजना गोविंद औटी, पोपट निवृत्ती औटी, रेखा बाळू औटी, श्रीकांत हरिभाऊ औटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच सासरे गोविंद औटी यांच्यासह चुलत सासरे बाळू औटी या दोघांना अटक करण्यात आली.