अहमदनगर

पाथर्डी तालुका : भक्तांसाठी लागले फराळाचे स्टॉल; मुस्लिम तरुणांकडूनही फराळ वाटप

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा: मोहटादेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि व्यक्तींनी पाथर्डी शहरासह तालुक्यातील ठिकठिकाणी शेकडो मोफत फराळ स्टॉल उभारले होते. मुस्लिम समाजातील तरुणांकडूनही पायी येणार्‍या देवी भक्तांना मोफत फराळाचे वाटप करण्यात आले.

शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर नारायण सानप मित्र मंडळच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नारायण सानप, बंडू भांडकर, राहुल कोठारी, भाऊसाहेब शिरसाट, बाळासाहेब घुले, शाहनवाज शेख, पप्पू चौनापुरे, नानासाहेब राऊत आदी उपस्थित होते.

अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान, गणेश तात्या सोनटक्के मित्र मंडळ व अर्जुना युवा प्रतिष्ठान, हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठान, आकाश वारे व शिक्षक कॉलनी मित्र परिवार, शनेश्वर भक्त मंडळ, खासदार डॉ. सुजय विखे मित्र मंडळ, डॉ. बंधू भांडकर मित्र मंडळ, एकलव्य तरूण मंडळ, सर्वयुग परिवा ट्रस्ट, क्षत्रिय युवा प्रतिष्ठान, बाळासाहेब सोनटक्के व इतर व्यापारी मित्र मंडळ, बँका व पतसंस्थांचे दैनंदिन बचत खात्याचे प्रतिनिधी मंडळ, नवोदय तरुण मंडळ, आजिनाथ डोमकावळे मित्र मंडळ व पावन गणपती प्रतिष्ठान, विठोबा राजे पेट्रोलियम व आमदार मोनिका राजळे मित्र मंडळ, इजाजभाई शेख मित्र मंडळ, स्वराज युवा प्रतिष्ठान, गजराज ग्रामविकास प्रतिष्ठान, शेवगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, तसेच अनेक दुकानदार, शेतकरी, गावागावातील गावकर्‍यांनी पोहे, चहा, पाणी, खिचडी व फळांचे वाटप केले. मोफत फराळ वाटप स्टॉलच्या ठिकाणी डीजेच्या तालावर नाचत देवी भक्तांनी या नवरात्री उत्सवाचा आनंद लुटला.

माऊली या फराळ घ्या.. अशी साद घालत फराळ वाटप करण्यात आले. महिला लहान मुले व तरुणांची पायी देवीला जाणार्‍यांची संख्या लक्षणीय होती.

SCROLL FOR NEXT