अहमदनगर

पोहेगाव : कुंभारीत अज्ञाताकडून झाडांची कत्तल

अमृता चौगुले

पोहेगाव; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावातील विद्यालय व आजूबाजूला लावलेल्या झाडांची आज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आली. या प्रकारामुळे वृक्षप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. वनविभाग व पोलिसांनी या व्यक्तींचा शोध घेऊन यांच्यावर कठोर कारवाई केली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान व गावातील वृक्षप्रेमी नागरिकांच्या मदतीने रयत शिक्षण संस्थेचे गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय व गावात विविध ठिकाणी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी मधून वय तीन वर्ष व त्यापुढील वयोगटाची झाडे गावात लावून ती संगोपन करण्याची जबाबदारी वृक्ष प्रेमींनी घेतली होती असल्याचे माजी सरपंच प्रशांत घुले व ललित नीलकंठ यांनी सांगितले. वड, लिंब, पिंपळ, चिंच, नारळ आदी प्रकारसह औषधी झाडेही या परिसरात लावली होती.

झाडे लावताना त्यांचे जनावरांपासून संरक्षण व्हावे म्हणून अवतीभोवती कुंपणही करण्यात आले होते. आज ही झाडे पाच वर्षाची पूर्ण झाली असताना काही अपप्रवृत्तीच्या अज्ञात लोकांनी या झाडावर रात्री कुर्‍हाड चालवली. सकाळी शाळेचे प्राचार्य यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना दिली.

कुंपनही तोडले झाडाच्या आजूबाजूला
संरक्षणासाठी लावलेले कुंपणही तोडून ते जाळण्यात आले. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून झाडांची कत्तल करणार्‍या या व्यक्तींचा तात्काळ शोध लावला जावा, अशी मागणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलिस व वन विभागाकडे केली आहे.

SCROLL FOR NEXT