श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गार येथील चोरीची चर्चा थांबत नाही, तोपर्यतच चोरट्यानी लोणी व्यंकनाथ गाव लक्ष्य करत एकाच रात्री सहा दुकाने व घरफोड्या केल्या आहेत. चोरटयांनी केलेल्या हल्ल्यात ब्लँकेट विक्रेते सुलेमान शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. दररोजच चोर्या करून चोरट्यांनी श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. बुधवारी मध्यरात्री सुलमान सय्यद व रवींद्र वडवकर यांचे दोन मेडिकल उघडून पाच हजारांची रोकड लंपास केली.गरीब कुंटुबातील प्रेम मोरे यांच्या सहा कोंबड्या चोरल्या. तसेच पांडुरंग पवार, खंडू खेतमाळीस यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.
मागील दोन महिन्यांपूर्वी एकाच रात्री सहा दुकाने व घरफोड्या झाल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती लोणीत घडली आहे. मागील तीन दिवसांत कौठा, गार शिवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत. श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोर्यांची मालिका सुरू झाली आहे. घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक अमीत माळी यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्याशी संपर्क साधला असता, वीजपुरवठा खंडित असल्याने फिर्याद दाखल करता आली नाही .लोणीतील चोर्यात विशेष असे काहीच नाही.
अन्यथा आंदोलन
राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी घरातील सामानाची उचकापाचक केली. नाहटा यांच्या घरातून किती मुद्देमाल चोरीस गेला, याचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, लोणीतील चोर्यांचा तपास न लागल्यास श्रीगोंदा पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब नाहाटा यांनी दिला आहे.