अहमदनगर

नगर : महावितरणकडून शट डाऊन; तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा होणार विस्कळीत

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : वीज वितरण कंपनीकडून शनिवारी (दि. 4) मुळा डॅम येथील फिडर दुरुस्ती, शिफ्टींगसाठी शटडाऊन घेतला जाणार आहे. तसेच शहरात पाणीच्या लाईनचे कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाक्या भरता येणार नाहीत. परिणामी शहरातील विविध भागास विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे.

मुळानगर, विळद, येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर आणि सारसनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागास सकाळी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

या भागाला रविवारी नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल. रविवारी (दि. 5) रोटेशननुसार सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय, सावेडी, स्टेशन परिसर, आगरकर मळा भागात पाणीपुरवठा होणार नाही. रविवार ऐवजी सोमवारी (दि. 6) सकाळी पाणीपुरवठा करण्यात येईल.

सोमवारी (दि. 6) घातलेल्या, मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी आणि गुलमोहर रोड, प्रोफेसर कालनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको या भागात पाणी पुरवठा होणार नसून मंगळवारी नियमित पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT