अहमदनगर

नगर : शिवसेना नेते अशोक गायकवाडांना धमकी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते अशोक गायकवाड यांना अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून दोन कोटींची मागणी केली. पैसे नाही दिले तर तुझा सिद्धू मुसेवाला करू आणि कुटुंबालाही मारून टाकून अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी अशोक गायकवाड यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत म्हटले, की प्रशांत पगारे व राबीन साळवे यांच्या नावाने पत्र पाठवून अज्ञात व्यक्तीने तुला जर तिथे राहयाचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील. नाही तर आम्ही तुझा सिद्धू मुसवाला आहोत. आम्ही अजून आठ दिवस वाट पाहणार आहोत. त्यानंतर तुझा सिद्धू मुसेवाला निश्चित करणार यात शंका नाही. यामध्ये आमचा ग्रूप आहे. तुझ्या कुटुंबालाही सोडणार नाही, अशी धमकी दिली. सहायक पोलिस निरीक्षक रणदिवे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT