Shirdi Prasad Bhojan  Pudhari
अहमदनगर

Saibaba Sansthan Shirdi | गॅस टंचाईमुळे साईबाबा संस्थानच्या प्रसाद भोजनालयात चुलीवर स्वयंपाक

Shirdi Prasadalaya | ४२ अंश तापमानात भोजनालयातील आचारी व मदतनीसांची अविरत सेवा

पुढारी वृत्तसेवा

Shirdi Prasad Bhojan

शिर्डी : युद्धसदृश परिस्थितीमुळे देशभरात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी साई संस्थान कडे पुरेसा गँस साठा शिल्लक होता. त्या नंतर युध्द परीस्थिती शमली असली तरी मात्र गँस टंचाईचा फटका साई संस्थाला आता बसु लागल्याच समोर आले आहे.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या प्रसाद भोजनालयाला गॅस टंचाई जाणवू लागल्याने या टंचाईतून मार्ग काढण्यासाठी संस्थानच्या वतीने जवळपास पाच ते सहा चुलीवर रोज भाज्या तयार करण्यात येत आहेत. त्याबरोबरच लाडू प्रसाद आणि बुंदीदेखील या चुलीवर तयार करण्यात येत आहे. भोजनालयाच्या पाठीमागील भागात अशा १० ते १२ मोठ्या चुली पेटविण्यात येत आहे. ४२ अंश तापमानात भोजनालयातील आचारी व मदतनीस निस्वार्थ भावनेने आपले योगदान देऊन भाज्या तयार करत आहेत.

साईबाबा संस्थानच्या भोजनालयात अंतर्गत भागात साईभक्तांसाठी वरण, भात, एक भाजी, चपाती व शिरा प्रसाद तयार केला जात आहे. सरासरी ३८ ते ४० हजार भाविक प्रतिदिन भोजन करत असतात. त्यांच्या साठी भात व भाज्या ह्या सोलर, बॉयलर वरील स्टिमवर शिजवल्या जातात. त्यानंतर भाज्या फोडणी, पोळ्या, बुंदी, नाष्टा पाकीट बनविण्यासाठी दररोज १५०० किलो गॅस साई संस्थानला लागतो.

भोजनालयाच्या अंतर्गत भागात वरण, पोळी आणि शिरा तयार केला जातो, साईभक्तांना प्रसाद भोजन दिला जातो. काही दिवसांपूर्वीच साईबाबा संस्थानला 18 टन गॅस उपलब्ध झाला असला तरी रोज सरासरी ५०० ते ६०० किलो गॅस फक्त चपाती, बुंदी करण्यासाठी लागत असतो.

त्यामुळे गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होत नाही. तोपर्यंत नाश्ता पाकिटात दिली जाणारी पुरी-मटकी, भोजनातील भाजी व मोफत वाटप केली जाणारी बुंदी या चुलींच्य माध्यमातून तयार केली जात आहे. गर्दीचे नियोजन बघून भोजनालयाच्या आत तर कधी बाहेरील आवारात मोठ्य पातेल्यात भाज्या तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी संस्थानच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT