अहमदनगर

शेवगाव बाजार समिती निवडणुक : 26 अर्ज दाखल; 74 अर्जांची विक्री

अमृता चौगुले

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, बुधवारी 74 अर्जांची विक्री झाली आहे. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी 26 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यात राष्ट्रवादी, भाजप, भाकप, काँग्रेससह अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवार आहेत. तर, गेल्या दोन दिवसात 146 अर्जांची विक्री झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा 74 अर्जांची विक्री झाली आहे. यामुळे निवडणुकीत उमेदवारांची भाऊ गर्दी होण्याची शक्यता आहे.

दाखल उमेदवारी अर्ज सहकारी पतसंस्था-सर्वसाधारण प्रवर्ग : अनिल बबनराव मडके, हनुमान बापुराव पातकळ, मारुती रामभाऊ थोरात, विजय नामदेव पोटफोडे, राजेंद्र रावसाहेब ढमढेरे, जगन्नाथ भाऊराव मडके, भरत वंसत वांढेकर, वंसत भुजंगराव औटी, भीमराज नारायन बेडके, श्रीकिसन प्रभाकर जुंबड, प्रसाद शिवाजीराव पवार, अनिल कुंडलीक घोरतळे, गणेश बाबासाहेब खंबरे. महिला राखीव : चंद्रकला श्रीकिसन कातकडे, लंका भरत वांढेकर. इतर मागास प्रवर्ग : रामभाऊ मारुती थोरात, संजय भगवान नांगरे, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग : सुभाष जनार्धन आंधळे, शरद गोरक्षनाथ सोनवणे, गणेश बाबासाहेब खंबरे, ग्रामपंचायत मतदार संघ- सर्वसाधारण प्रवर्ग : फिरोज हकीम पठाण, शरद गोरक्षनाथ सोनवणे, राजेंद्र शिवनाथ दौंड. व्यापारी, आडते मतदार संघ – विठ्ठल गोकुळ थोरात, अमोल एकनाथ फडके, जाकीर शफी कुरेशी आदी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT