अहमदनगर

नगर : शनि शिंगणापुरातही होणार मास्कसक्ती?

अमृता चौगुले

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या नवीन व्हेरियेंन्टच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कता बाळगण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अन्य देवस्थानांप्रमाणे शनिशिंगणापुरातही भाविक व कर्मचार्‍यांना लवकरच मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार आहे.
शनिवार व रविवारी नाताळ सुट्ट्यानिमित्त शिंगणापूरमध्ये मोठी गर्दी झाली होती. भाविकांसाठी अद्यापि कुठलेही कोरोना नियम सक्तीचे केले नाहीत. मागील काही महिन्यांत कोरोना गेल्यात जमा झाला होता.

आता इतर देशांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीसह अन्य देवस्थानांनी मास्क सक्ती सुरू केली आहे. शनिशिंगणापुरातहही पुढील आठवड्यात कोरोना नियमावली व मास्कसक्ती केली जाणार असल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली. नाताळ सण व नववर्षाचे आगमन होत आसल्याने शनिवारपासून शनिदर्शनासाठी मोठी गर्दी सुरू झाली आहे. मास्कची सक्ती नसली तरीही अनेक भाविक स्वतःहून मास्क वापरत आहेत. येत्या एक दोन दिवसांत देवस्थान विश्वस्त मंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. शनिशिंगणापूरमध्ये देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नाताळ सुट्टी व नवीन वर्षानिमित्त दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे. वाढती गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना व आवाहन केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT