अहमदनगर

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सपत्नीक शनिदर्शन

अमृता चौगुले

सोनई : पुढारी वृत्तसेवा  :  सालाबादप्रमाणे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी कुटुंबियांसमवेत शिंगणापूरला येऊन शनिदर्शन घेतले. शनिमंदिरातील संत उदासी महाराज मठात पत्नी व मुलांसमवेत शनीला अभिषेक करून चौथर्‍यावर जाऊन तेल अर्पण केले. यावेळी भाविकांनी मुख्यमंत्र्यांसमवेत छायाचित्रे काढण्यासाठी मोठी गर्दी केली.
देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त दीपक दरंदले यांनी चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, शनि प्रतिमा देऊन सन्मान केला. मुख्यमंत्री चव्हान म्हणाले, दरवर्षी शनिदर्शनासाठी येत असून, शनि महाराजांच्या दर्शनाने प्रेरणा मिळते.

साईबाबा व शनिमहाराजांंच्या दर्शनाने वर्षाची सुरुवात चांगली होण्यासाठी येतो. दरम्यान, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर भाविकांनी काल सकाळपासून शनि दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. कोरोनाचे संकट पाहता देवस्थाने आवाहन केल्याने अनेक भाविकांनी तोंडाला मास्क लावलेले होते. शनिशिंगणापुरात येणार्‍या भाविकांच्या वाहनामुळे सोनई, ब्राम्हणी, उंबरे येथे दिवसभरात अनेकदा वाहतूक कोंडी झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT