अहमदनगर

सरन्यायधीश चंद्रचूड यांचे शनिदर्शन

अमृता चौगुले

सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भारताचे 50 वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी सायंकाळी शनिशिंगणापूरला येऊन शनिमूर्तीवर तेल अभिषेक करत शनिदर्शन घेतले. मुळा कारखान्याच्या हेलिपॅडवर सायंकाळी पाच वाजता त्यांचे आगमन झाले. तेथून शनिशिंगणापूरला दर्शनासाठी आले. चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक कतर उदासी महाराज मठात अभिषेक केला.

त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नेवाशाचे जिल्हा न्यायाधीश बी. वाय. जाधव, पोलिस अधीक्षक राकेश ओला, तहसीलदार बिराजदार आदी उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, शनिप्रतिमा व प्रसाद देऊन सन्मान केला. यावेळी शेवगाव उपविभागाचे पोलिस उपधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT