शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : शिर्डीजवळील रुई शिवारात साई निवारा येथील बंगल्यात छापा टाकून शिर्डी पोलिसांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड केले. त्यात एका पीडित तरुणीची सुटका करून दोन जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. मिटके यांची शिर्डी येथे बदली होताच त्यांनी काही हॉटेल व लॉजिंगवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायांचा भांडाफोड करीत थेट हॉटेलमालकांना आरोपी केले होते.
दरम्यान, बुधवारी रात्री मिटके यांना रुई शिवारात साईनिवारा येथील बंगल्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकून पोलिस पथकाने एका तरुणीची सुटका केली. दौलत किसन लटके (वय 47, रा. कोपरगाव), अंकुश संजय घोडके (रा. कालिकानगर, ता. राहाता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक सविता भांगर यांनी याबाबत फिर्याद दिली. दौलत लटके यास याआधी वेश्याव्यवसाय प्रकरणी शिर्डीतील मोठ्या कारवाईत अटक केली होती. आता पुन्हा त्याच गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :