अहमदनगर

राहुरी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज चक्काजाम

अमृता चौगुले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : कांद्यास प्रती क्विंटल 2,500 रुपये भाव मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.28) फेब्रुवारी रोजी नगर- मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कांद्याला प्रति क्विंटल 2,500 रुपये हमीभाव मिळावा. अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. निर्यातीवर 500 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे. नाफेड मार्फत कांदा 2,500 रुपये क्विंटलने खरेदी करावा.

अतिवृष्टीने व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण होऊन चार महिने होऊन देखील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्य व केंद्र सरकारला माहिती देऊन अ. नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसानीचा एक रुपया देखील मिळाला नाही. तत्काळ बँक खात्यात रक्कम जमा करावी आदी मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सकाळी 10.30 वाजता महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन होत असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले.

SCROLL FOR NEXT