अहमदनगर

सावेडी : सराफा पेढीला ‘ग्राम सुरक्षा दला’चे कवच : पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव

अमृता चौगुले

सावेडी; पुढारी वुत्तसेवा : बाजारपेठेतील सराफा पेढींसाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून सुरेक्षेचे कवच निर्माण केले जाईल, तसेच व्यवसायिकांच्या ज्याकाही समस्या असतील त्या सोडविण्यासह पोलिसांची तत्काळ मदत देण्यात येईल, असे प्रतिपादन कोतवाली पोलिस ठाण्याचेे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.

सराफ सुवर्णकार व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिक व पोलिसांमध्ये समन्वय साधण्यासाठी संवाद साधला. यावेळी संघटनेचे अध्यथ प्रकाश लोळगे, सुभाष कायगावकर, प्रमोद बुर्‍हाडे, श्रेनिक शहा, शामराव मुंडलिक, सत्यनारायण वर्मा, शुभंम मिरांडे, रोशन हिंगणगावकर, संतोष देडगावकर, आकाश लोणकर आदी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक यादव म्हणाले, पोलिसांची तत्काळ मदत मिळविण्यासाठी सराफ व्यावसायिकांच्या मदतीने ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येईल. व्यावसायिकांनी परिसरात उत्तम 'सीसीटीव्ही' कॅमेरे लावावेत, ग्राहकांबरोबर व्यवहार करताना त्यांच्याकडून नाव, पत्ता, मोबाईल नंबर घ्यावा, संशयित व्यक्तीची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी, असे अवाहन त्यांनी केले. नागरिकांनी बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमण धारक व हॉकर्सना शिस्त लावण्याची मागणी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचेकडे केली.

बैठकीत सकारात्मक चर्चा : कायगावकर
पोलिसांचे नागरिकांना नेहमीच सहकार्य मिळणे अपेक्षित असते. मात्र, संवादाच्या अभावामुळे त्यांची काल्पनिक भीती बाळगली जाते. आज पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढाकार घेऊन सराफ व्यवसायिकांशी मनमोकळा संवाद साधला. यापूर्वी कधीही असे झाले नाही. यामुळे बैठकीत सकारात्मक चर्चा घडल्याने समाधान वाटले, अशी भावनिक मत व्यावसायिक सुभाष कायगावकरांनी व्यक्त केले.

गंजबाजार चौकीत कर्मचारी नियुक्त करा : लोळगे
सराफ बाजारात यापूर्वी गंजबाजार पोलिस चौकी कार्यरत होती. या ठिकाणी पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती नसल्याने बाजारात भूरट्या चोरांचा वावर वाढला. अनेकदा चोर पळून जाण्यात यशस्वी होतात. त्यामुळे गंजबाजारातील पोलिस चौकीत कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोळगे आणि शुभंम मिरांडे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT