अहमदनगर

संगमनेर : साकुरच्या चिंचेवाडीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला वृद्धाचा मृतदेह

backup backup

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर जवळील चिंचेवाडी शिवारात मली बाबा मंदिरासमोर ६५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यामध्ये दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली.त्यामुळे तालुक्याच्या पठारभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

देवराम मुक्ता खेमनर वय ६५ रा. चिंचे वाडी साकुर ता संगमनेर जि.अनगर असे खून झालेल्या मयताचे नाव आहे. साकूर ते संगमनेर महामार्गालगतच्या चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिर आहे.या मंदिरा बाहेर छोटसे शेड उभारलेले आहे. याच शेडमध्ये देवराम खेमनर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पो कॉ काॅन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, गणेश लोंढे, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी देखील केली. त्या मृतदेहाजवळच दगड, चप्पल,आधारकार्डासह इतर कागद पत्रे आढळून आले. यावेळी बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पडलेला होता.या वेळी श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान मृतदेहाजवळच दगड, चप्पल, आधारकार्डासह इतर कागदपत्रे आढळून आले. मृतदेहाच्या बाजूला पडलेला दगड पुर्णपणे रक्ताने माखलेला होता. यावेळी श्वानाला परिसरात फिरवण्यात आले. त्या नंतर देवराम खेमनर यांचा मृतदेह त्वरित शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला. परंतु देवराम खेमनर यांचा खून कुणी व कशा साठी केला असावा याबाबत परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या वृद्धाचा खून कोणी केला त्याचा तपास लावणे घारगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT