अहमदनगर

नगर : शिर्डी महोत्सवात साईचरणी 18 कोटी

अमृता चौगुले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : नाताळ सुटी, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या आठ दिवसांत साईचरणी 18 कोटीचे दान भक्तांनी अर्पण केले. 25 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 याकालावधीत सुमारे 8 लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात 17 कोटी 81 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. 16 कोटी 84 लाख 69 हजार 396 रुपयांची देणगी रोख स्वरुपात तर अन्य देणगी ही सोन्या-चांदीच्या रुपाने प्राप्त झाली.

शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत सुमारे 8 लाख साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन सेवेचा यात समावेश आहे. ऑनलाईन व सशुल्क दर्शन,आरती पासेसव्दारे 1 लाख 91 हजार 135 साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यातून 4 कोटी 5 लाख 12 हजार 542 रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच श्री साईप्रसादालयात 5 लाख 70 हजार 280 साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. 1 लाख 11हजार 255 साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच 8 लाख 54 हजार 220 लाडू प्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली असून त्यातून संस्थानला 1 कोटी 32 लाख 19 हजार 200 रुपये प्राप्त झालेले आहे.

साईआश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास येथे 1लाख 28 हजार 52 साईभक्तांनी निवास केला. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात 16 हजार 207 साईभक्तांनी आश्रय घेतला. या दोन्ही ठिकाणी 1 लाख 44 हजार 259 साईभक्तांची निवासाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली होती. 31 डिसेंबर 2022 व 1 जानेवारी 2023 या दोन दिवसांत 171 साईभक्तांनी रक्तदान केले.

SCROLL FOR NEXT