अहमदनगर

सहकार महर्षी नागवडे कारखाना बनला सी.बी.जी.गॅस व बिकेट प्रकल्प उभा करणारा देशातील पहिला कारखाना

अमृता चौगुले

काष्टी वार्ताहरः देशामध्ये व राज्यामध्ये पहिल्यांदा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना हा बुट ( बांधा , वापरा व हस्तांतरीत करा ) तत्वावर प्रेसमडपासुन सी.बी.जी. गॅस तयार करण्याचा व बग्यास पासुन ब्रिकेट तयार करण्याचा प्रकल्प हाती घेणार असुन असा प्रकल्प हाती घेणारा नागवडे साखर कारखाना हा देशातील पहिला साखर सहकारी साखर कारखाना असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आज दि.२१ रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी अध्यक्ष नागवडे यांनी सांगितले की , आपले कारखान्यामध्ये प्रतिवर्षी जी प्रेसमड तयार होते त्यापासुन सुमारे एक कोटी रुपयापर्यंत उत्पन्न कारखान्यास मिळते . परंतु हा प्रकल्प उभारणी केल्यानंतर त्यापासुन सुमारे ४ कोटी रुपये कारखान्यास मिळणार आहे . म्हणजे अप्रत्यक्षरित्या ३ कोटीचे उत्पन्न वाढणार आहे .

या प्रकल्पाची सी.बी.जी. गॅस निर्मीतीची प्रतिदिन क्षमता ५ मेट्रीक.टन असुन या प्रकल्पामध्ये तयार होणारा गॅस वाहनांना इंधन म्हणून वापरला जाणार आहे . सदरचा सी . बी . जी . गॅस हा कारखान्याने शासनाचे दराप्रमाणे घेवून त्याची आऊटलेटद्वारे विक्री केली तर त्यामाध्यमातून सुमारे १ कोटी रुपयांचे उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे . अशा प्रकारे कारखान्यास दरवर्षी ४ ते ५ कोटी नफा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे बगॅसपासुन १०० ते ८०० मेट्रिक . टन प्रतिदिन क्षमतेचा हायडेसिग्नेटेड स्टॉल्क ( ब्रिकेट ) बनविणेचा प्रकल्प नव्याने हाती घेत आहोत . सध्या बगॅसपासून साधारण १३०० ते १४०० प्रतीटन उत्पन्न कारखान्यास मिळते . परंतु सदरचा प्रकल्प हाती घेतलेनंतर सुरुवातीस हा दर सुमारे २००० ते २१०० रुपयापर्यंत मिळेल व नंतर यादरामध्ये आणखी ८०० ते १००० रुपयापर्यंत वाढ होईल . त्यामुळे कारखान्यास सुमारे ३ ते ४ कोटी रुपये नफा होणार आहे . भविष्यात बगॅसचे व प्रेसमडे दर वाढले तर त्याप्रमाणांत उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

या दोन्ही प्रकल्पाची संचालक मंडळाने समक्ष पहाणी करुन व गेल्या सहा महिन्यांपासून त्याचा अभ्यास करुन हे दोन्ही प्रकल्प प्रायोगिक तत्वावर हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे . हे दोन्ही प्रकल्प उभे करत असताना त्यामध्ये कारखान्याची कोणत्याही प्रकारची गुंतवणुक असणार नाही . त्याकरीता कारखाना फक्त जागा उपलब्ध करुन देणार आहे . सदर कंपनीशी १५ वर्षाचा करार पुर्ण झालेनंतर तो प्रकल्प कारखान्याकडे हस्तांतरीत करणेत येणार आहे .

अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेणारा नागवडे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला सहकारी साखर कारखाना असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस , संचालक सुभाष शिंदे, अनिल पाचपुते, प्रशांत दरेकर, राकेश पाचपुते सावता हिरवे, मारुती पाचपुते, यांच्यासह अनेक संचालक सभासद हजर होते. शेवटी माजी उपाध्यक्ष व संचालक सुभाष शिंदे यांनी सर्वाचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT