अहमदनगर

नगर : महसूलमंत्री विखे पाटील यांच्या विकासकामांचे शेजारच्यांना दुःख ; खा. डॉ. सुजय विखे यांची टीका

अमृता चौगुले

राहाता : पुढारी वृत्तसेवा : राहिली. आजीमाजी महसूल मंत्र्यांच्या कामाची तुलना आता समाजातील प्रत्येकजण आता करू लागल्याने शेजारच्यांना याचे दु:ख होत असल्याची टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.
राहाता बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने साकुरी गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्याप्रसंगी खा. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, संचालक अ‍ॅड. रघुनाथ बोठे, संचालक विजयराव गोर्डे, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर, भाजपाचे शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, गंगाधर बोठे, नंदकुमार गव्हाणे, विरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने, दिपकराव रोहोम, नानासाहेब बोठे, वाल्मिकराव गोर्डे, सुरेश गाडेकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, भारत लोखंडे, सचिन मुरादे, संदीप दंडवते, अ‍ॅड. रवींद्र बोरकर, गोटु सदाफळ, प्रा. बाळासाहेब गाडेकर, ज्ञानेश्वर सदाफळ, गंगाधर बोठे, हेमंत गोर्डे, प्रकाश पुंड यांचेसह साकुरी, अस्तगाव, खडकेवाके, पिंपळस, दहेगाव, तसेच अन्यभागातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांच्या रुपाने मिळालेले मंत्रीपद आपल्याला नवे नाही. मंत्रीपद असो असावा नसो, समाजासाठी काम करण्याची भूमिका ही त्यांची कायम आहे. मात्र जे मलई खातात, त्यांना महसूलमंत्रीपद मोठे वाटते. राज्यातील महसूल विभागातील 140 प्रांत, 150 तहसीलदारांच्या बदल्यांमध्ये कोणी तक्रार करू शकले नाही. आज अनेकजण या तालुक्यात येऊन येथील सहकारी संस्थांना दृष्ट लावण्याचे काम करीत आहेत. मंत्री असताना त्यांना पिंपळस, दहेगाव आठवले नाही, त्यांना जे करायचे ते करू द्या, तुम्ही कार्यकर्ते आमची ताकद आहात. असे स्पष्ट करून डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, आम्ही वाळू तस्कारांना पोसत नाही. 10 ठेकेदार कार्यकर्त्यांना सांभाळण्यापेक्षा सर्वसामान्यांसाठी 600 रुपये ब्रासने वाळू उपलब्ध करून माफीयागिरीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हद्दपार केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली संघटना ही कार्यकर्त्यांची आहे. संघटनेत प्रत्येक कार्यकर्ता हा तोलामोलाचा आहे. कुणाला उमेदवारी असो अथवा नसो, सर्वांना सन्मानच असतो. खडकेवाके येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या 10 कोटींचा प्रकल्पास मंजुरी मिळाली असल्याचे सांगत खासदार डॉ. विखे म्हणाले की, या प्रकल्पात शेळ्या, मेंढ्या यांचे लोकर, ब्रिडींग, मांस निर्यात, उपपदार्थ निर्मिती तेथे होणार आहे. येत्या 15 दिवसात त्याचे भूमिपूजन होणार असून, या प्रकल्पातून 200 ते 300 तरुणांना नोकरी मिळू शकेल. यासाठी तरुणांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, राहत्याचे माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांची भाषणे झाली. याप्रसंगी सर्व उमेदवारांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाजार समितीची निवडणूक औपचारिकता
बाजार समितीची निवडणूक ही फक्त आता औपचारिकता राहीली आहे. मागील 5 वर्षांत बाजार समितीतून शेतकर्‍यांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. आपल्या बाजार समितीने राज्यात आदर्श निर्माण करुन वेगळेपण जपले आहे. कोविड संकटातही शेतकर्‍यांना दिलासा देण्याची भूमिका घेतली गेली. मात्र मागील आघाडी सरकारमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांनी त्यांच्या बाजार समित्या बंद ठेवून शेतकर्‍यांना देशोधडीला लावले, तेच आता आम्हाला येवून शहानपणा शिकवित आहेत, अशी टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT