अहमदनगर

संगमनेर : भगवंत प्राप्तीसाठी तळमळ महत्त्वाची : राठी महाराज

अमृता चौगुले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला सत्ता प्राप्तीसाठी जेवढी तळमळ असते. तेवढी तळमळ भगवंताच्या आराधनेसाठी नसते, असे परखड मत शिवपुरान कथाकार माधवदास महाराज राठी यांनी व्यक्त केले. संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथेचे चौथे पुष्प गुंफताना माधवदास महाराज राठी बोलत होते.

त्रंबकेश्वर येथील प्रेमानंदशास्त्री आंबेकर महाराज, गगनबावडाच्या आश्रमाचे विलासगिरी महाराज, महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, साकुरी येथील विलास रोहम, गगणबावड्याचे माजीसरपंच नंदकुमार पवार, फत्तेसिंह माने, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, संजय महाराज देशमुख, गगनबावडा आश्रमाचे बाळू महाराज, जिल्हा बँक संचालक गणपतराव सांगळे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, किरण महाराज शेटे, पोपट महा राज आगलावे, दादासाहेब वर्पे, कपिल पवार, बाळासाहेब ताजने, पृथ्वीराज थोरात, देवराज थोरात, अ‍ॅड. सम्राट शिंदे, डॉ. दिग्विजय शिंदे, रावसाहेब दिघे, शेखर गाडे, संजय पुंड, सुजित वाकळे, सागर वाकचौरे, बाळासाहेब देशमुख, किसन पानसरे, राजेंद्र देशमुख, राजेंद्र पानसरे, नितीन पानसरे, कारभारी राहणे, विजय पानसरे आदी उपस्थित होते.

राठी महाराज म्हणाले की, मुला-मुलींच्या प्रेमापोटी अति आंधळे होऊ नका. त्यांच्या हातातला मोबाईल आई-वडिलांनी अधूनमधून तपासून पाहावे.मोबाईलच्या आतीवापरामुळे अनेक भीषण समस्या निर्माण झाल्या आहे आणि त्यामुळेच सध्याच्या काळात प्रेम विवाहाचे विषय बाजूला गेले असून लव्ह जिहाद सारखे भयानक विषय पुढे आले आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापर किती आणि कशासाठी करायचा? हे ठरवा नाही तर तुम्हाला पश्चाताप केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

अग्नी चांगला आहे. परंतु त्याचा किती उपयोग करायचा हे ठरवा तसेच मोबाईल किती चांगला आहे पण त्याचा वापर किती करायचा? हे प्रत्ये काने ठरवावे. प्रत्येकाला मोबाईल वापरण्याचे स्वातंत्र्य असावे. परंतु त्याचा स्वैराचार नसावा मी हे केले मी ते केले ,असे कधीही सांगू नका, नाही तर तुमच्या वाटेला दुःखाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सोबत करणार्‍या सहकार्य करणार्‍या त्या हजारो हातांच जर विस्मरण व्हायला लागल तर त्याला कृतज्ञा म्हणतात. यासाठी हजारो हात राबतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. हे सर्व माझ्यामुळे होत आहे, हे मी केले, असेल जर नेत्याला वाटायला लागल, नेता अभिमानी झाला तर हजरो कार्यकर्ते बाहेर निघून जातात. कारखान्यात हजारो हात काम करतात. त्यावर उद्योगपती मोठा होतो. येथे हजारो हात काम करतात ते महत्वाचे आहे, म्हणून ही सेवा आहे. भुतलावर प्रत्येकाचं तेवढंच महत्त्व आहे.

दीपोत्सवाने शिवपुराण कथेची सांगता

संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे सुरू असणार्‍या स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात सहा दिवसांपासून सुरू असणार्‍या शिवपुरान कथेची सांगता दीप पूजन, शिव स्मरण, माणूस पूजा करून दिपोत्सवाने होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी आज मंगळवारी, सायंकाळ येताना मेणबत्ती नव्हे तर दिवा, समई घेऊन यावे, असे आवाहन शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांनी केले आहे.

भक्तीसाठी पारायणाची व्यवस्था

माणूस सतत जागा राहावा आणि परमार्थाच्या मार्गावर तसेच सदाचार आणि नितिमत्तेच्या मार्गावर चालत राहावा. यासाठी अखंड भक्ती त्याच्या आयुष्यामध्ये असावी, यासाठी संतांनी पारायणायाची व्यवस्था केली असल्याचे सेवानिवृत्त प्रशासकीय सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी केले.

SCROLL FOR NEXT