संगमनेर शहर; पुढारी वृत्तसेवा : शिर्डीवरून आलेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून ओळखीतील 19 वर्षीय तरुणीशी नोकरी करत असलेल्या शहरातील 'टॉप टेन' या इमारतीत येऊन त्याने तिच्याशी झटापट करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आणि तिला संभाजी करत इमारतीवरून फेकून देण्याची धमकी दिली.
संगमनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिर्डी येथील राहणारा आकाश पवार या तरुणाची तीन वर्षापासून या तरुणीशी ओळख होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याची ओळख असणार्या तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला त्याने फोन केला. 'तू खाली येते की, मी वर येऊ, असे दरडून म्हणत खाली बोलवले. तेथे येत ती आली असता तो म्हणाला की, 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून त्यांनी आपल्या तिचे केस धरून अंगातील टी-शर्ट धरून ओढला.
हा सर्व प्रकार 'टॉप टेन' इमारतीत असणार्या सुरक्षारक्षकांनी पाहिला त्याने त्याला हटकले असता त्या तरुणांनी त्यालाही शिवीगाळ करून दमदाटी केली' त्यानंतर ती पुन्हा दुकानाकडे निघून गेली. तो वरती गेला आणि त्या दुकानातील कर्म चार्यांना सुद्धा त्याने दमदाटी केली आणि तो तिला म्हणाला की, 'तुला मी वरून खाली फेकून देतो' अशा प्रकारची धमकी देऊन तो निघून गेला.
या घाबरलेल्या या तरुणीने सायंकाळी घरी जाऊन तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर आकाश पवार याने सदर मुलीच्या घरी जाऊन सुद्धा तिच्या आई-वडिलांना व भावाला दमदाटी करत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तिने शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारदिली पोलिसांनी सदर तरुणीच्या फिर्यादीवरून आकाश पवार यांच्या विरोधात शहर पोलिसात विनयभंगा मारहाण व दमदाटी या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.