आमदार प्रा. राम शिंदे 
अहमदनगर

कुसडगाव SRPF मधील नातवाच्या स्टंटबद्दल पवारांनी बोलावे : राम शिंदे

पुढारी वृत्तसेवा

जामखेड : ज्येष्ठ नेते शरद पवार हे शनिवारी जामखेड दौर्‍यावर येत आहेत. ते गेल्या पन्नास- साठ वर्षांपासून देशाच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांना राजशिष्टार चांगला माहित आहे. गुरूवारी (दि.२६) कुसडगाव एसआरपीएफ सेंटरमध्ये रोहित पवारांनी स्टंट केला व एसआरपीएफ व पोलिसांना वेठीस धरले. शरद पवारांनी नातवाचा हा स्टंट बरोबर होता का? हे सांगून राजशिष्टाचार काय असतो हे त्यांनी कर्जत-जामखेडसह राज्यातील जनतेला सांगितले पाहिजे, असा टोला आमदार प्रा. राम शिंदे यांनी शरद पवारांना लगावला.

आमदार शिंदे यांची गावभेट जनसंवाद पदयात्रा जामखेड तालुक्यात सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून आमदार शिंदे गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत आहेत. शुक्रवारी ते कुसडगाव दौर्‍यावर होते. यावेळी जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, डॉ. भगवान मुरूमकर, रविंद्र सुरवसे, शरद कार्ले, संजय काशिद, सोमनाथ पाचरणे, पांडुरंग उबाळे, डाॅ गणेश जगताप, जालिंदर चव्हाण, सरपंच पप्पु कात्रजकर, मोहन पवार, संजय कार्ले, महालिंग कोरे, तात्याराम पोकळे, भानुदास टिळेकर, रामभाऊ टिळेकर, दादासाहेब कात्रजकर, दिलीप गंभिरे, निलेश वाघ, भरत भोगल, विठ्ठल कात्रजकर हे उपस्थित होते.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, एसआरपीएफच्या जवानांना इतक्या वेळ वेठीस धरणं योग्य आहे का? हे जवान जनतेच्या सुरक्षेसाठी आहेत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे जवान काम करत असतात. शरद पवार उद्या जामखेडमध्ये येणार आहेत. ते राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते. ते देशाचे कृषि, संरक्षण मंत्रीही होते.त्यांना राजशिष्टाचार चांगला माहित आहे. कुसडगावला जे काही घडलं त्यावर त्यांनी बोललं पाहिजे. राजशिष्टाचार काय असतो हे त्यांनी जनतेला सांगायला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT