करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कौशल्यनिरंजन वाघ यांनी ही कारवाई केली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचा पंचनामा करण्यात आला. गोवंश सदृश्य जनावरांचे मांस बेकायदा विक्रीसाठी ठेवणारा इरफान गफूर शेख व अस्लम हनीफ शेख (रा. रविवार पेठ तिसगाव, ता पाथर्डी) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांच्या फिरदीवरून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसगाव येथे दोन-तीन ठिकाणी खुलेआम कत्तलखाना सुरू असून, या कत्तलखान्याविरोधात अनेकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. कत्तलखान्यावर छापा टाकण्यात आला. या गोमांस विक्रीमुळे आजूबाजूच्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.