वळण : पुढारी वृत्तसेवा : गतिमान म्हणून मिळवणार्या सरकारने मागील सहा महिन्यांपूर्वी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना अद्याप कुठलीही मदत दिली नाही. आता चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसाच्या तडाख्यात पुन्हा शेतात काढणीस आलेला गहू, मका, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असे सांगत शासनाने आता तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागगी आ. प्राजक्त तनपुरे यांनी केली. दरम्यान, याप्रश्नी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आ. तनपुरे म्हणाले.
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने वळणसह परिसरात शेतातील गव्हाच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आज (शनिवारी) आ. तनपुरे यांनी वळण येथे नुकसानग्रस्त शेतांमध्ये पिकांची पाहणी केली. यावेळी ते शेतकर्यांशी संवाद साधताना बोलत होते.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ढोकळे, निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी, तलाठी कविता गडधे, कृषी सहाय्यक बी. टी. गडधे, ग्रामसेवक संतोष राठोड यांना शेतकर्यांसमोर केवळ 33 टक्केच बाधित क्षेत्राचे नव्हे तर वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आदी महत्त्वाच्या सूचना केल्या. आ. तनपुरे यांनी केवळ एकाच ठिकाणी भेट न देता शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन अनेक पिकांची पाहणी केली. यावेळी सरपंच सुरेश मकासरे, माजी उप सभापती रविंद्र आढाव, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, दत्तात्रय खुळे, बाळासाहेब खुळे, बी. आर. खुळे, प्रकाश आढाव, बाबासाहेब आढाव, बाळासाहेब शिंदे, एकनाथ खुळे, रोहिदास आढाव, मुकिंदा काळे, विक्रम कार्ले, संजय आढाव, वसंत कारले, कैलास देशमुख, बाबासाहेब कार्ले, उमेश खिलारी, रविंद्र गोसावी, दादासाहेब कुलट आदी उपस्थित होते. पहाणी नंतर आ. तनपुरे यांनी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून घरकुल, नवीन तलाठी कार्यालयाबाबत माहिती घेतली.