अहमदनगर

नगर: नागेश विद्यालायातील “प्रजासत्ताक दिन” नावची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमधील नोंद गौरवास्पद : तहसीलदार चंद्रे

अमृता चौगुले

जामखेड, पुढारी वृतसेवा: देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील "प्रजासत्ताक दिन "नाव रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये 500 विद्यार्थी व कन्या विद्यालयाच्या 500 विद्यार्थीनी असे 1000 विद्यार्थी व एनसीसी कॅडेट यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन साकारले होते. या घटनेची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून ही गोष्ट जामखेडच्या वैभवात भर घालणारी आहे. तसेच शाळेचे, संस्थेचे व गावाचे नाव देशपातळीवर चमकले आहे. ही बाब जामखेडकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे मत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी नागेश विद्यालयात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह वितरण सोहळ्यामध्ये व्यक्त केले.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, राष्ट्रवादीचे राजेंद्र कोठारी, कन्या स्कूल कमिटी अध्यक्ष मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले,विनायक राऊत, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, ग्रामसेवक युवराज ढेरे पाटील, केंद्रप्रमुख मुकुंद सातपुते, कृष्णाजी भोसले ,शिवाजीराव ढाळे, पर्यवेक्षक संजय हजारे, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, कॅप्टन गौतम केळकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व एनसीसी कॅडेट उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र सन्मान वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, नागेश विद्यालयामध्ये 500 विद्यार्थी व कन्या विद्यालयाच्या 500 विद्यार्थीनी असे 1000 विद्यार्थी व एनसीसी कॅडेट यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन "प्रजासत्ताक दिन " हे नाव साकारले होते. त्याची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. यामध्ये नागेश विद्यालय व कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन यावेळी तहसीलदार चंद्रे यांनी केले.

प्राचार्य मडके म्हणाले की,आमदार रोहित पवार यांनी विद्यालयात राजमाता जिजाऊंचे सर्वात मोठे रेखाचित्र साकारले होते. त्याच प्रेरणेतून आम्ही हा उपक्रम केला आहे. त्यानुसार नागेश विद्यायात प्रजासत्ताक दिन हे नाव विद्यालयात साकारण्यासाठी कलाशिक्षक मयूर भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. हे नाव विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने प्रत्यक्षात साकारण्यात आले असल्याचे प्राचार्य मडके यांनी सांगितले. यावेळी नागेश विद्यालयाचे सर्वस्तरातून आभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT