अहमदनगर

केडगावात जुगार अड्ड्यावर छापा ; दहाजण अटकेत

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील केडगाव भागातील शिवाजीनगर येथील एका खोलीत जुगार खेळणार्‍या दहा जणांना कोतवाली पोलिसांनी गुरुवारी (दि.3) रात्री पावणेबाराच्या सुमारास धाड टाकून अटक केली आहे. या कारवाईत तीन लाख 19 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल संदीप हेमंत थोरात यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शंकर आहेर (वय 29, रा.केडगाव), काळू मारुती शिंदे (वय 43, वैदूवाडी, पाईपलाईन रोड), मारुती वाळवंत नरसाळे (वय 51, राहणार गोरेगाव ता. पारनेर), नीलेश आदिनाथ कोतकर (वय 27, केडगाव), दत्ता खुशालचंद गिरमे (वय 37, केडगाव), इमाम इब्राहीम पठाण (वय 62, रा. केडगाव), सतीश परसराम जेजुरकर (लोंढे मळा), दीपक पंढरीनाथ कोतकर (केडगाव), इम्तियाज बहादुर शहा (गजानन कॉलनी, एमआयडीसी), विजय रावसाहेब सुंबे (वय 34, केडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
विनोद मगर याच्या खोलीत काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती कोतवालीचे ठाणेदार संपत शिंदे यांना मिळाली होती.

त्यानुसार कोतवाली पोलिसांच्या पथकाने धाड टाकून जुगार्‍यांना मुद्देमालासह अटक केली. या कारवाईत 70 हजार 480 रुपये रोख, 44 हजार रुपये किमतीचे 12 मोबाईल व दोन लाख 5 हजार किमतीच्या दुचाकी असा तीन लाख 19 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, सोमनाथ राऊत, सायकर, प्रशांत बोरुडे यांच्या पथकाने केली.

SCROLL FOR NEXT