अहमदनगर

नगर : रोडरोमिओंविरोधात पोलिस अ‍ॅक्शन मोडवर…

अमृता चौगुले

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेलवंडी पोलिस स्टेशन हद्दीमधील शाळा, महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस परिसरामध्ये विनाकारण मुलींची छेडछाड करणे, मागेपुढे धूम स्टाईलने गाडी पळवणे, अशा रोड रोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी बेलवंडी पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. बेलवंडी पोलिसांनी यासाठी परिसरातील मुख्याध्यापक व प्राचार्यांची मीटिंग आयोजित केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.

बुधवारी दुपारी एक ते दोन या दरम्यान बेलवंडी पोलिस स्टेशन हद्दीतील शाळा, विद्यालय, मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शाळा व महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, 18 वर्ष खालील मुला मुलींना दुचाकी शाळेत आणण्यास मनाई करणे. शाळा भरताना व सुटताना आपले शिक्षक गेटवर नेमावे, पोलिस स्टेशनचा नंबर सर्वांना दिसेल असा लावावा, वाहतुकीचे नियम बाबत, मोबाईल व सोशल मीडिया बाबत,सायबर क्राईम या संदर्भात मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांनी काळजी घ्यावी, याबाबत पो. नि. आहेर यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती पो.कॉ. हसन शेख यांनी दिली.

SCROLL FOR NEXT