अहमदनगर

नगर : भाईगिरी करणार्‍यांना पोलिसांचा दणका.!

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बसस्थानक परिसरातून वाहन घेऊन जात असताना एका मद्यपीला कट लागल्याचे कारण देऊन चालकाला तीन ते चार लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. चालकाची चूक नसताना भाईगिरी करीत मारहाण करणार्‍या टोळक्याचा माज कोतवाली पोलिसांनी चांगलाच जिरवला आहे. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दोन आरोपींना तत्काळ अटक केली.

वाहनचालक अशोक दगडु खंडागळे (वय 32, वर्ष, रा. सर्वे 106 हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक दगडु खंडागळे हे त्यांचे वाहन सगम हॉटेल समोरून घेऊन जात असताना एक मद्यपी वाहनासमोर आला. त्याच ठिकाणी उभे असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने खंडागळे यांना विनाकारण लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस जवान घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता वाहनाचा कट बसलेला इसम हा दारूच्या नशेत होता. त्यामुळे तो स्वतःहून वाहनाच्या समोर आला व त्याला वाहनाचा कट बसला. त्यानंतर चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सेजल अस्लम मन्यार (वय 24 वर्ष, रा. माळीवाडा, ढोर गल्ली, अहमदनगर), साहील कासीम शेख (वय 22 वर्ष रा. पंचपीर चावडी, बागवान गल्ली अहमदनगर) या दोन आरोपींनी अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT