अहमदनगर

सोनई : वाहनधारकांना पावती न देता दंड

अमृता चौगुले

सोनई; पुढारी वृत्तसेवा : सोनईत मार्चअखेरीच्या नावाखाली दुचाकी व चारचाकी वाहनांची अचानकपणे तपासणी होत असून, वाहनधारकांना कुठलीही पावती न देता दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम नेमकी कोणाच्या खिशात जातेे याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपासून सोनईत दुचाकी, चारचाकी तपासणीच्या नावाखाली अचानकपणे चौकाचौकांत, तसेच राहुरी- सोनई, नगर -संभाजीनगर मार्गावर उभे राहून पोलिस पथक वाहनांना दंड आकारत आहे.

काही वाहनांना दंडाची पावती दिली जाते, तर अनेकांबरोबर 'अर्थ' पूर्ण तडजोड केली जात असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. दंडाची कुठलीही पावती किंवा ऑनलाईन दंड झाला असल्याचे वाहनधारकांना दिसत नाही. वाहनधारकही पावतीची मागणी करीत नाहीत. त्यामुळे तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी परिस्थिती सध्या सोनईत आहे.

शिर्डीहून येणार्‍या अवैध प्रवासी वाहतूक करणारे 400 ते 500 वाहनधारक आहेत. त्यांची प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वाहतूक कर्मचार्‍यांशी खासगीरित्या भेट जर झाली नाही, तर अशा वाहनांना थांबवून केसेस दाखवल्या जातात. भरघाव चालणार्‍या अवैध प्रवासी वाहनांमुळे अनेक वेळा अपघात ाले आहेत. पोलिस यंत्रणा प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

सोनई पोलिसांना सापडेनात अवैध धंदे
सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध कट्टे, जुगाराचे अड्डे, अवैध दारूचे अड्डे नगरच्या गुन्हे अन्वेषण पथकाला सापडतात पण सोनई पोलिसांना हे ठिकाण का सापडत नाही, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

SCROLL FOR NEXT