अहमदनगर

जामखेड : पवार बोलत नाही, तर करून दाखवतात : आमदार रोहित पवार

अमृता चौगुले

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : मतदारसंघात अडीच वर्षांत विकास कामांची गंगा आणली, त्यासाठी मतदारसंघात विविध विकास कामे मार्गी लावली. शेतकर्‍यांच्या उसाची अडचण दूर करण्यासाठी हळगावचा साखर कारखाना घेतला आहे. परंतु, विरोधकांनी आदीनाथला विरोध केला होता, तर शेवटी हळगावचा कारखान घेतला. आम्ही पवार आहोत, बोलत नाही, तर करून दाखवतोत, असे आमदार रोहित पवार म्हणाले. पोलिस वसाहत, पंचायत समिती कार्यालय इमारत, नगरपरिषद इमारत, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती वसाहतसह साकत ते जवळा जिल्हा हद्द रस्ता, विविध विकासकामांना हजारो कोटींचा निधी आणला

. त्यामुळे मतदारसंघात सर्वाधिक जलजीवन योजनेचे कामे मंजूर करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात विकास कामांची गंगा आणली आणि येथून पुढे विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नसल्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. जवळा येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जवळ्याचे सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच रोहिणी वाळूंजकर, राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत शिंदे, दीपक पाटील, काकासाहेब वाळूंजकर, शहाजी वाळूंजकर, अशोक पठाडे, रणजीत पाटील, सुनील उबाळे, नय्युम शेख, प्रदीप दळवी, विष्णू हजारे, किरण रोडे, रघुनाथ मते, भाऊसाहेब कसरे, राहुल हजारे, इरफान पठाण, अक्षय वाळूंजकर आदी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, जवळा येथील 20 कोटींच्या जलजीवन योजेनेच्या सुरुवातीला ही योजना पांढरेवाडी (ता परंडा, जि.धाराशिव) येथून आणताना त्यासाठी सर्वे करावा लागला. दोन वेळा सर्वे केला, त्यात काही त्रुटीची होत्या, त्यांची पूर्तता करत ही योजना 20 कोटीपर्यंत निधी उपलब्ध केला. योजना मंजूर करण्यासाठी यामध्ये दोन वर्षांचा कालावधी गेला. त्यावेळेसचे सर्व सर्वे व इतर कागदपत्रे माझ्याकडे आहेत. यामुळे विरोधकांनी हवेत श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा घणाघात विरोधकांवर आमदार पवारांनी केला.

जवळ्यासाठी कोट्यवधींचा निधी : प्रशांत शिंदे
जलजीवन मिशनअंतर्गत जवळा येथील पाणीपुरवठा योजना, जवळा येथे नांदणी नदीवर पुलाची मागणी होती, ती मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली. त्यासाठी तत्काळ दोन कोटी 50 लाखांचा निधी उपलब्ध केला. पुलाच्या कामाची सुरुवात केली. यामुळे आमदार पवारांनी जवळा गावात कोट्यवधीचा निधी दिला.

उसाची अडचण सोडविण्यासाठी 'जय श्रीराम'
शेतकर्‍यांच्या हितासाठी आदिनाथ सहकारी कारखाना चालवण्यास घेत होतो; परंतु राजकीय नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाची अडचण सोडवायची होती म्हणून हळगावातील जय श्रीराम साखर कारखाना घेतला. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची अडचण कमी होणार आहे. तसेच, तालुक्यातील ऊस व उसतोड कामगारांचाही फायदा होणार आहे. शेतकर्‍यांची अडचण होत असताना पवार कसे शांत राहणार.

SCROLL FOR NEXT