अहमदनगर

पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघ; एका उमेदवारामुळे दहा जागांसाठी निवडणूक

Laxman Dhenge

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाच्या सहकारी सेवा संस्था मतदारसंघातील 10 जागांसाठी 11 उमेदवार उभे राहिल्याने, या दहा जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. उर्वरित पाच मतदारसंघात आमदार मोनिका राजळे गटाचे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत 17 जागांसाठी एकूण 60 उमेदवार रिंगणात उभे होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवशी यातील 42 जणांनी आपले अर्ज मागे घेतले.

मात्र, सहकारी सेवा संस्था मतदारसंघात दहा जागांसाठी अकरा उमेदवार उभे ठाकले आहेत. यापैकी दहा उमेदवार राजळे गटाचे आहेत. विरोधी गटाचा हा उमेदवार जरी निवडून आला तरीही संघाची सत्ता पुन्हा एकदा आमदार राजळे गटाच्या ताब्यात येणार आहे. आमदार राजळे समर्थकांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सहकारी संस्था मतदारसंघात दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात राहिल्याने त्यांना यश आले नाही.

सहकारी सेवा संस्था मतदारसंघ वगळता महिला प्रतिनिधी, व्यक्तिगत सभासद, इतर मागास-विजाभज व अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. आमदार मोनिका राजळे यांनी जुन्या 17 पैकी 4 संचालकांनाच संधी देऊन नव्या चेहर्‍यांना प्राधान्य दिले आहे. महिला प्रतिनिधी मतदारसंघातून सिंधू अशोक साठे व सुनीता मधुकर काटे, व्यक्तिगत सभासद प्रतिनिधी मतदारसंघातून अशोक लक्ष्मीनारायण मंत्री, बाबासाहेब श्रीपती चितळे व पोपट मोहन कराळे, इतर मागासवर्ग-विजाभज मतदारसंघातून पुरूषोत्तम भास्कर इजारे व अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून संतोष श्रीधर भागवत हे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
सहकारी सेवा संस्था निवडणुकीत दहा जागांसाठी उभे असलेले अकरा उमेदवार पुढील प्रमाणे – भगवान आव्हाड, गंगाधर गर्जे, कैलास देवढे, राम पठाडे, संदीप पठाडे, भीमराव पालवे, नवनाथ भवार, विठ्ठल मरकड, अण्णा वांढेकर, बाळू शिरसाठ, मच्छिंद्र सावंत. या मतदारसंघात एकूण 96 मतदार असून, 28 जानेवारीला मतदान होऊन, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी राजळे यांच्यावर आरोप करत, या निवडणुकीत सहभाग न घेतल्याने, ही निवडणूक बिनविरोध होईल, असे मानले जात होते. मात्र, कृषी मंत्रालयात काम करणार्‍या एका कृषी अधिकार्‍याने आपल्या मर्जीतील उमेदवाराचा अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक अधिकारी जी. एम. नांगरे व सहायक अधिकारी म्हणून ई. एम. राठोड हे काम पाहत आहेत.

राजळेंकडून नव्या चेहर्‍यांना संधी

निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांनी मागील वेळेस संचालक म्हणून काम केलेल्या गंगाधर गर्जे, संदीप पठाडे, सिंधुताई साठे व संतोष भागवत यांना पुन्हा संधी दिली आहे. तर, जुन्या 14 संचालकांना उमेदवारी नाकारून नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT