टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन Pudhari
अहमदनगर

शिर्डी विमानतळामुळे कृषी माल निर्यातीची संधी ! : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीमुळे साईभक्तांना मोठ्या सुविधा मिळणार आहेत. शिर्डी नव्हे तर शेजारील इतर धार्मिक स्थळांनाही याचा लाभ होवून जिल्ह्यासह राज्याचे पर्यटन वाढेल. या विमानतळाचा शेतकर्‍यांनाही कृषि माल विदेशात पाठविण्यासाठी उपयोग होवून कृषि मालाची निर्यात करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिर्डी येथील अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन दुरदृष्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

राज्यपाल सी.पी राधाकृष्णन्, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार आदि नेते या कार्यक्रमास उपस्थित होते.

तर शिर्डी विमानतळावर संपन्न झालेल्या कार्यक्रमास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT