file photo 
अहमदनगर

शिर्डी : पाळणेवाल्यांसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा

अमृता चौगुले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डी येथील श्रीरामनवमी यात्रेत झालेल्या पाळणा अपघातात तिघे यात्रेकरू गंभीर जखमी झाल्याप्रकरणी पाळणा चालवणारा तसेच पाळणा घेणारा ठेकेदार आणि जागा मालक यांच्याविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिर्डी पोलिस स्टेशनचे पोकॉ. सतपाल दत्तू शिंदे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 1 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास श्रीसाईबाबा प्रसादालयासमोरील पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या पाळण्याचा अपघात होऊन पाळण्याची एक बकेट तुटून खाली पडल्याने त्यात तिघेजण तुटून ती जखमी झाले.

पैकी एक जणाची प्रकृती चिंताजनक आहे. सदर पाळणा हा शिवाजी अर्जुन भोसले यांच्या मालकीचा आहे.े पाळणा चालवणारा ऑपरेटर अजय शिवाजी भोसले हा होता. सदर पाळणा लावण्यासाठीची जागा ही रमेश, विजय व किशोर भाऊसाहेब गोंदकर (रा. शिर्डी) यांच्या मालकीची असून त्यांनी सदर जागा ही पाळण्याचे चालक हसन अब्दुल सय्यद यांना करार करून सदर पाळणा चालवण्यासाठी दिली होती. याप्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी अर्जुन भोसले (रा. वाडेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर ), हसन अब्दुल सय्यद (रा. श्रीरामनगर, शिर्डी) व जागेचे मालक, संयोजक किशोर भाऊसाहेब गोंदकर, रमेश भाऊसाहेब गोंदकर, विजय भाऊसाहेब गोंदकर (रा. शिर्डी) यांच्यावर विविध कल्मान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT