अहमदनगर

संगमनेर : ‘न्याय’ दुधासह पदार्थ परराज्यांमध्ये पोहोचविणार; सागर गीते यांचा निर्धार

अमृता चौगुले

राजेश गायकवाड

संगमनेर : भारतीय बाजारपेठेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दूध व दूग्धजन्य प्रदार्थांचा उच्च गुणवत्तेचा 'न्याय' नावाचा उद्योग, व्यवसाय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांतही पोहोचविणार आहे, असे सांगत आपल्या मातीतील दूध उत्पादक शेतकर्‍याला आर्थिक फायदा मिळवून देण्याचा निर्धार पिंप्री लौकी अझमपूर येथील नव उद्योजक सागर गीते या शेतकरी परिवारातील उद्योजक तरुणाने व्यक्त केला.

भारतीय बाजारपेठेस अत्याधुनिक टेक्नॉलाजी वापरून उद्योग, व्यवसायस उभारी देत दुष्काळी भागात दूध उत्पादक शेतकर्‍याला आर्थिक फायदा मिळवून देण्यासह बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे, असे सागर गीते म्हणतात. संगमनेर तालुक्यात पुर्व भागात पिंप्री लौकी अझमपूर येथे शेतकरी कुटुबांतील तंत्रज्ञान शिक्षण (आय टी इंजिनिअर) झालेले सागर गीते यांनी मातीशी प्रामाणिक राहून 'आपली माती, आपली माणसं' हे धोरण अवलंबले.

तंत्रज्ञान युगात दूध उत्पादक शेतकर्‍याने आर्थिक बाबतीत प्रगती पथावर भरारी घ्यावी, या हेतूने आश्वी, पिंप्री लौकी अझमपूर, खळी, झरेकाठी, दाढ, शिबलापूर, पानोडी, हंगेवाडी, शिबलापूर, शेडगाव, ओझर , उंबरी, निमगाव जाळी या गावांसह प्रवरा परिसर व पठार भागात दूध उत्पादकांना अर्थ लाभ व्हावा, या हेतूने मनाशी गुणगाठ बांधत दूध उत्पादक, बेरोजगार युवक, वाहतुकदारांना आर्थिक व्यवहारातून न्याय मिळावा म्हणून 'न्याय' नावाने दूध व दूग्धजन्य प्रदार्थ उद्योग प्लॅट हनुमानवाडी (आश्वी खुर्द ), आश्वी – गुहा – शिबलापूर येथे सुरु केला. या प्लॅन्टसाठी तरुण उद्योजक सागर गीते यांनी साडेसात कोटी रुपयांचे बजेट आखले आहे.

छोट्या- मोठ्या दूध उत्पादक शेतकर्‍याला उभारी देवून त्याला आर्थिक प्रगतीची दिशा दाखविण्याची मनोकामना असल्याचा विश्वास सागर गीते यांनी व्यक्त केला. बेरोजगार तरुणांना योग्य सुख – सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मिती करणार आहे. 'न्याय' डेअरीमधून उत्कृष्ट व्यवस्थापन करणार आहे. तंत्रज्ञान युगात डेअरीचे दर्जदार, विश्वासु, क्लॉलिटी पदार्थ ग्राहकांपर्यत पोहचविणार आहे. 'न्याय' डेअरीचे पदार्थ ऑनलाईन मुंबई, पुणे शहरांसह राज्याबाहेर बुकींग करणार आहे.

'न्याय' डेअरीला अल्पावधीतच नामांकित कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवून देणार आहे. आय.एस.ओ. व हॅसप मानांकन दर्जा मिळविणार आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांशी सातत्य ठेवून दूध संकलन वाढविणार आहे. संकलनाच्या 60 टक्के दुधाच्या पिशव्या तर 40 टक्के दुधाचे उपपदार्थ बनविले जातात. यात दूध पावडर, ताक, सुगंधी दूध, तूप, बटर, खवा, पनीर, श्रीखंड, आम्रखंड, ताक, लस्सी व दही आदी पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांची बाजारपेठेत 'न्याय' नावाने मोठ्या प्रमाणात विक्री करणार आहे, असे गीते म्हणाले.

दूध उत्पादक शेतकर्‍यांनी केवळ दोन – तीन गायांद्वारे दूध व्यवसाय करु नये. गायींच्या संख्येत वाढ करुन, दूध व्यवसायाला चालना देवून, कुटुंबाची आर्थिक क्रांती घडवावी. दूध व्यवसायात मध्यस्थी न घेता थेट डेअरी प्लॅन्टशी संपर्क ठेवून आपल्या दोन पैशात वाढ करण्याची साठी या ग्रामीण भागात 'न्याय' डेअरी प्लॅन्ट उभा करण्याची हिंमत दाखविली, असे उद्योजक गीते यांनी आवर्जून सांगितले.

काही दिवसांमध्ये हनुमानवाडी (आश्वी खुर्द), आश्वी, गुहा – शिबलापूर चौक परिसर नंदनवन दिसेल, असा विश्वास सागर गीते यांनी व्यक्त केला. शिबलापूर येथे अकॅडेमी सुरू करून, होतकरू तरुणांना उज्ज्वल जीवन घडविण्याची संधी निर्माण करणार असल्याचे गीते म्हणाले.

'न्याय' उद्योग समूह दूध उत्पादक शेतकर्‍यांना थेट उत्पादकांच्या नावाने पगार देणार आहे. ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडे दुधाला लगेचच बाजारपेठ निर्माण केल्याने या व्यवसायाच्या माध्यमातून संगमनेरच्या पुर्व भागाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. ग्राहकांना शुद्ध व उच्च दर्जाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यास 'न्याय' समूह कटीबद्ध राहणार आहे.

              -नव उद्योजक सागर गीते, पिंप्री लौकी अझमपूर, ता. संगमनेर

SCROLL FOR NEXT