[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या काष्टी गटातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. गुरुवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रकियेत भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी सोमवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे कारखान्यास पाच वर्षांत तीन वेळा ऊस घातला नाही, हा मुद्दा उपस्थित करुन नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र गटाचे उमेदवार योगेश भोयटे यांनी हरकत घेतली आहे.
या एका जागेसाठी योगेश भोयटे, संदीप नागवडे, दीपक भोसले, कुंडलिकराव भोसले, सतीश गुणवरे, सुनील पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
छाननी प्रकियेत योगेश भोयटे यांच्या वतीने अॅड. सुनील भोस, अॅड. अशोक रोडे, अॅड. जयंत शिंदे यांनी बाजू मांडली. संदीप नागवडे यांच्या वतीने अॅड. संदीप कावरे यांनी काम पाहिले. छाननी प्रकिया सुरू होताच संदीप नागवडे यांनी पाच पैकी तीन वर्षांत उस घातला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवावा, असा युक्तिवाद केला. त्यावर संदीप नागवडे यांच्या वकिलांनी पाचपैकी एक वर्ष कारखाना बंद होता आणि एक वर्ष साखर सह संचालक यांनी आदेश देऊनही ऊस नेला नाही. त्यामुळे नागवडे यांचा उमेदवारी अर्ज वैध आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून लोखंडे यांनी 17 एप्रिल रोजी निर्णय देण्यात येईल, असे सूचित केले.
[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]
आता माघार नाही
मी उमेदवारी भरला होता. मला या निवडणुकीत फारसा रस नव्हता. पण, राजेंद्र नागवडे यांच्या समर्थकांनी माझ्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. तीन वकील उभे केले. मी आमदार बबनराव पाचपुते यांच्याशी चर्चा करून माघार घेणार होतो. पण आता माघार घेणार नाही, असे संदीप नागवडे यांनी सांगितले.
वादाची ठिणगी
बाजार समिती निवडणुकीत पाचपुते व नागवडे समर्थक एकत्र आले आहेत. पण, नागवडे कारखाना पोटनिवडणूक छाननीत संदीप नागवडे यांच्या उमेदवारी अर्जावर नागवडे समर्थकांनी हरकत घेतल्याने दोन्ही गटातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. घेतली. यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जाणार आहे.