अहमदनगर

नगर: शिक्षक बँकेसाठी इच्छुक वाढतेच..! मंगळवारी 341 उमेदवारी अर्ज प्राप्त

अमृता चौगुले

नगर: जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या बनलेल्या शिक्षक बँकेसाठी काल तिसर्‍या दिवशी 341 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे आतापर्यंत 466 उमेदवार अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त असून, 1188 अर्जांची विक्री झाल्याची माहिती पुढे आली.

शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी 17 जूनपासून उमेदवारी अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. सोमवारी दिवसभरात 125 अर्ज दाखल होते. तर काल मंगळवारी सकाळी 11 नंतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.दिवसभरात 341 नवीन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे एकूण अर्जाची संख्या आता 466 इतकी झाली आहे. तर कालही काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. त्यामुळे अर्ज विक्रीची संख्या 1188 पर्यंत गेली होती. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात देविदास घोडेचौर, अल्ताफ शेख यांनी अर्ज स्वीकृतीचे काम पाहत आहेत..

नॉन टीचिंग ः 13
अनुसूचित जाती जमाती ः 24
महिला राखीव ः 49
इतर मागास ः 55
वि.जा.भ. ः 43

सर्वसाधारण

संगमनेर ः 32
नगर ः 11
पारनेर ः 21
कोपरगाव ः 15
राहाता ः 21
श्रीरामपूर ः 26
जामखेड ः 21
पाथर्डी ः 29
राहुरी ः 15
शेवगाव ः 16
श्रीगोंदा ः 19
अकोले ः 15
नेवासा ः 22
कर्जत ः 19

SCROLL FOR NEXT