अहमदनगर

Nagar : महायुतीचा आज जिल्हास्तरीय मेळावा

Laxman Dhenge

 नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात रविवारी (दि. 14) सकाळी महायुतीचा जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय मेळावा होणार आहे. नगर-मनमाड रस्त्याजवळील बंधन लॉन येथे होणार्‍या या मेळाव्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), रासप, प्रहार जनशक्ती, रिपाईं (आठवले गट) आदी पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक आमदार संग्राम जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, कपिल पवार, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले, भाजपचे महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, राज्यात एकाच वेळी 36 जिल्ह्यात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. महायुतीच्या घटक पक्षामध्ये मत भिन्नता आहे. ती मतभिन्नता संपविण्यासाठी उद्या बंधन लॉन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार भक्कमपणे काम करीत आहे. येणार्‍या 2024 च्या लोकसभेत महाराष्ट्रातून महायुतीचे 45 पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक येतील. त्यात नगर जिल्ह्याचा मोठा वाटा असणार आहे. या मेळाव्या महायुतीचे सर्व ज्येष्ठ आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी सर्वच घटक पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधाला आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. तिथे सर्वच घटनापक्षाच्या समन्वयासाठी साधक-बाधक चर्चा होणार आहे. आचारसंहिता लागल्यापासून निकाल लागेपर्यंत काय नियोजन करता येईल, या विषयी चर्चा होणार आहे.

विसंगती असली तरी कटूता नाही

महायुतीच्या घटक पक्षामध्ये थोडी विसंगती असली तरी स्वभावामध्ये कटुता अजिबात नाही. देशाला पुन्हा मोदींचे नेतृत्व हवे यासाठी त्यासाठी सर्वजण काम करीत आहेत, असेही खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT