अहमदनगर

कोळपेवाडी : माझा सन्मान सर्व महिलांना समर्पित! चैतालीताई काळे

अमृता चौगुले

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : मला समाज कार्याची प्रेरणा मतदार संघातील महिलांकडून मिळते. त्यामुळे ज्या- ज्यावेळी समाज कार्याबद्दल माझा सन्मान केला जातो, तो सन्मान माझा नसून मतदार संघातील प्रत्येक महिलेचा असतो, असे प्रतिपादन जिल्हा बँक माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी केले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, राजयोग अध्यात्मिक मेडिटेशन ध्यान केंद्राने महिला दिनाचे औचित्याने उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कोपरगाव तालुक्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चैतालीताई काळे सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या.

काळे म्हणाल्या, मेडिटेशनचे असंख्य फायदे आहेत. राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी यांनी अध्यात्मिक मेडिटेशन ध्यान केंद्राच्या माध्यमातून कोपरगावसह नाशिक विभागात मोठे काम केले. मेडिटेशनच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. त्यांच्या अनुयायांना याचा मोठा फायदा झाला, असे सांगत काळे परिवाराचा समाज कार्याचा वारसा पुढे चालविताना महिला सबलीकरणासाठी माझे प्रेरणास्थान मतदार संघातील सर्व महिला आहेत, असे त्या म्हणाल्या.

मतदार संघातील प्रत्येक स्त्री जी गृहिणी असेल, उद्योग- व्यवसाय करीत असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, शासकीय सेवेत असेल किंवा महिला बचत गटाची सदस्या असेल, या प्रत्येक महिलेकडून मला प्रेरणा मिळते. यामुळे समाज कार्यासाठी मला खर्‍या अर्थाने उर्जा मिळते, असे काळे म्हणाल्या.

यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, सुधाताई ठोळे, स्वाती कोयटे, सिमरन खुबाणी, शीतल वाबळे, रश्मी जोशी, मनजीतकौर पोथीवाल, रेखा उंडे, अनुपमा बोर्डे, लता भामरे, संजीवनी शिंदे, मंगल वल्टे, पुजा शर्मा, रत्ना पाटील, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाक्चौरे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाक्चौरे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रेखा जगताप, गौतम बँक संचालक सुनील शिलेदार, अ‍ॅड. शंतनु धोर्डे, अशोक आव्हाटे, नारायण लांडगे, ठकाजी लासुरे, अर्जुन डूबे, अ‍ॅड. मनोज कडू, शुभम लासुरे, सुमित भोंगळे, गौरी पहाडे, बेबीआपा पठाण, रश्मी कडू, सुषमा पांडे, रुपाली कळसकर, शितल वायखिंडे, भाग्यश्री बोरुडे, नंदा लासुरे, छाया फरताळे आदी उपस्थित होत्या.

मतदारसंघातील सन्मानासाठी आहे पात्र..!
कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक महिला सन्मानास पात्र आहे. मला मिळणारा सन्मान हा मतदार संघातील सर्व महिलांना समर्पित करीत असल्याचे भावनिक उद्गार चैतालीताई काळे यांनी काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT