सोनई; पुढारी वृत्तसेवा : महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सोनई पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. याबाबत मयत महिलेचा भाऊ सीताराम नामदेव बर्डे (घाटशिरस, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली. कुसुम ऊर्फ राधाबाई अरुण माळी (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती अरुण याने चारित्र्याचा संशय घेऊन 14 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजेदरम्यान मारहाण करून तिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात पुढील तपास करीत आहेत.