अहमदनगर

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस चौंडीला येणार

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजी होणार्‍या जयंती महोत्सवाससाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडी येथे येणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आमदार राम शिंदे यांनी दिली. या जयंती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज युवराज तिसरे यशवंतराव होळकर यांना विशेष निमंत्रित केले असल्याचेही आमदार प्रा. शिंदे यांनी सांगितले. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी 31 मे रोजी जयंती महोत्सव होणार आहे. शासनाने या महोत्सवासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आमदार प्रा. शिंदे व ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. 31 मे रोजी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज यशवंत राजे होळकर चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा एक नियोजन आढावा बैठक होणार आहे.

प्रा. शिंदे म्हणाले, चौंडी येथे खारघरच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांसाठी तेथे भव्य मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, कुलरसह अन्य आवश्यक सुविधा केली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने राज्य शासनातर्फे जाहीर पुरस्काराचे वितरण करण्याचे नियोजन आहे. राज्य सरकारतर्फे एखाद्या सार्वजनिक सुविधेचे भूमिपूजन व एखाद्या नव्या योजनेची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असेही प्रा. शिंदेंनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT