बोटा : अकलापूर गावातील आपत्ती ग्रस्त आदिवासी समाजातील दुधवडे कुटुंबाला सांत्वनपर भेट देत खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार वैभव पिचड यांनी रविवारी भेट देत दिलासा दिला आहे.
घरकुल व विजेची सोय उपलब्ध करून द्या, अशा सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी अधिकार्यांना दिल्या असून यासंदर्भात जिल्हाधिकार्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले, तर माजी आमदार वैभव पिचड यांनी दुधवडे कुटुंबाच्या दुःखात सामील होत आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी परिसरात गुरुवार, दि. 9 जून रोजी दुपारी वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पावसाने घराच्या भिंती कोसळून विठ्ठल भीमा दुधवडे, हौसाबाई भीमा दुधवडे, साहिल सुभाष दुधवडे हे तिघे जण ठार झाले होते, तर वनिता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे या दोघी जखमी झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडे यांनी रविवारी 12 जून रोजी सायंकाळी या दुधवडे कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. यावेळी समवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, तहसीलदार अमोल निकम, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमर कतारी, दिनेश फटांगरे, सचिन साळवे, श्याम राहणे, रणजित ढेरंगे, अशोक वाघ, दत्ताभाऊ गाडेकर, नंदू कान्होरे, एकनाथ मुंढे, उत्तम ढेरंगे, संकेत कोल्हे, लहू आभाळे, राजेंद्र गवांदे, खंडू जाधव, महेश शेळके आदी उपस्थित होते.
हेही वाचा: