अहमदनगर

बोट्यामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमृता चौगुले

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्यात अंतर्गत आंबी खालसा गावच्या परिसरात 35 वर्षीय वासनांध व्यक्तीकडून चहा पावडर मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून दहा वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करत विनयभंग केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. आंबी खालसा परिसरात एका कुटुंबातील दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतमजुरी बरोबर किराणा दुकानाचा छोटासा व्यवसाय करत आहे. गुरुवारी सकाळी पिडीत कुटुंबातील आई-वडील किराणा दुकानातील काम आवरण्यासाठी गेले असता.

पीडित मुलीला घरचे काम आवरण्यासाठी सांगितले होते. तेव्हा पीडित मुलगी एकटीच घरी होती. यावेळी आरोपी चंद्रकात रामचंद्र गाडेकर नामक व्यक्ती चहा पावडर मागण्यासाठी आला. चहा पावडर घेण्यासाठी मुलगी स्वयंपाक घरात गेली असता आरोपी तिच्या पाठीमागे गेला. तिने या मुलीला लज्जास्पद वाटेल, असे वर्तन केले. सदर मुलीची आई घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार तिने आईस सांगितला. यानंतर या मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली. यावरून आरोपी चंद्रकात गाडेकर याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणामुळे बोटा परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

SCROLL FOR NEXT