नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या 17 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात राहिले. शेवटच्या दोन दिवसांत 8 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले तरी अपक्षांमुळे सत्ताधार्यांचा बँक बिनविरोध करण्याचा डाव फसला. अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या 17 जागांसाठी 65 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 17 जागांसाठी 31 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले होते. अर्ज माघारीची गुरुवारी(दि. 16) शेवटची तारीख होती.
सत्ताधार्यांनी गेल्या दहा दिवसांमध्ये सर्वच इच्छुकांनी संपर्क केला आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली. त्यात काही जण सत्ताधार्यांच्या गळा लागले परंतु, काही जणांनी अर्ज माघारी घेण्यास थेट नकार दिला. त्यामुळे सत्ताधार्यांचा बँक बिनविरोध करण्याचा डाव फसला आणि आजअखेर 22 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून सुभाष मोडालाल बायड यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध झाले. केवळ बिनविरोध निवडीची घोषणा बाकी राहिली. उद्या चिन्हाचे वापट होणार असून, निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी काम पाहत आहेत.
रिंगणातील उमेदवार
सर्वसाधरण : मोहन बरेमचा, संजय चोपडा, अजय मुथा, हस्तीमल मुनोत, किशोर मुनोत, संजय बोरा, किशोर गांधी, प्रमोद अष्टेकर, अनिल पोखारणा, संजीव गांधी, कमलेश भंडारी, हरिष भांबरे, अमित मुथा. अनुसूचित जाती, जमाती ः सुभाष बायड, महिला राखीव ः मीना मुनोत, प्रमिला बोरा, श्रृतिका मगर, इतर मागासवर्ग ः विजय कोथिंबीरे, हरिष भांबरे, वि.जा. म. ज. विमाप्र ः सुभाष भांड, प्रमोद अष्टेकर, निशांत दातीर.