अहमदनगर

नगर : ठाकरे सेनेची ‘मशाल’ मिरवणूक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर शिवसेनेचे मूळ चिन्ह आणि नाव गोठविण्यात आले. त्यामुळे शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव असून, मशाल चिन्ह मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मशाल पेटवून शहरात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, अभिषेक कळमकर, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा आदी उपस्थित होते.

महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, शिवसेनेने नेहमीच समाजकार्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शिवसेनेची जनसामान्यांत चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा शिवसेनेवर मोठा विश्वास आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 'मशाल' हे चिन्ह शिवसेनेला मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. यापूर्वीही शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे हे चिन्ह शिवसैनिकांसह सर्वसामान्यांना प्रेरणा देईल, असे सांगितले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ढोल ताशांच्या गरजरात या मिरवणुकीची ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीची नेता सुभाष चौक येथे सांगता करण्यात आली.

SCROLL FOR NEXT