Marrige and Eduction
भारतात शिक्षणापेक्षा लग्नात वारेमाप खर्च होत आहे.  File Photo
अहमदनगर

भारतात शिक्षणापेक्षा लग्नात वारेमाप खर्च

पुढारी वृत्तसेवा

भारतीय लोक शिक्षणापेक्षा लग्नावर जादा खर्च करीत असल्याचे एका अहवालातून पुढे आले आहे. भारतातील विवाहसमारंभात वर्षाला १३० अब्जाची उलाढाल होत असून अमेरिकेपेक्षा भारतात लगीसराईतील धामधुमीवर मोठा खर्च केला जात आहे. भारतात सरकारी १२.५ लाख ते १५ लाखांपर्यंत खर्च केला जात असल्याचे जेफरीजच्या | अहवालात म्हटले आहे. Marrige and Eduction

भारतात विवाहसोहळा हा पवित्र मानला जातो. सध्या या सोहळ्याकडे 'इव्हेंट' म्हणून पाहिले जात आहे. लग्नसोहळ्यावेळी अन्नधान्य उद्योगामध्ये मोठी आर्थिक उलाढाल पाहावसाय मिळते.

भारतातील लग्नसोहळ्याची बाजारपेठ अमेरिकेपक्षा दुप्पट असली तरी चीनमध्ये लहान आहे. लग्नसोहळ्याचा ठेका घेणाऱ्या कॅटरिंग उद्योग समूहातील विविध घटकांशी भेट घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षणापासून पदवीच्या

शिक्षणापर्यंत मुलांवर जेवढा खर्च केला जातो, त्याच्या दुप्पट खर्च विवाह सोहळ्यात खर्च केला जात आहे. हे चित्र अमेरिकेच्या नेमके उलटे आहे. अमेरिकेत लग्नापेक्षा शिक्षणावर दुप्पट खर्च केला जात आहे.

• सकल राष्ट्रीय उत्पादनातील दरडोई उत्पन्नापेक्षा पाच पटीने लग्नसोहळ्यात खर्च केला जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. वर्षाला केला जाणाऱ्या कौटुंबिक खचपिक्षा तिपटीने लग्नसोहळ्यावर खर्च केला जात आहे. अन्य देशात लग्नावर भारतापेक्षा कमी खर्च केला जातो.

सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांपेक्षा श्रीमंत कुटुंबाच्या विवाहसोहळ्यात कमीत कमी ३० लाखांपर्यंत खर्च केला जातो. श्रीमंताच्या विवाहसोहळ्यात प्रिवेडिंगपासून हनीमूनपर्यंत खर्च केला जातो.

• भारतातील लग्नसोहळ्यामुळे कॅटरिंग, ट्रव्हलिंग, हॉटेलिंग आदी क्षेत्रात मोठी उलाढाल होते, तर ज्वेलरीमध्ये सर्वाधिक उलाढाल पाहावयास होते. सर्व्हिस प्रोव्हायडरची सुद्धा लग्नकार्यात मोठी चलती असते.

SCROLL FOR NEXT