अहमदनगर

मोहटा देवी गडावर भाविकांची मांदियाळी ! सातव्या माळेची पर्वणी साधत सुमारे सात लाख भाविकांनी घेतले भक्तिभावाने दर्शन

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र मोहटा देवी गडावर सातव्या माळेच्या पर्वणी साधत सुमारे सात लाखांहून अधिक भाविकांनी देवी दर्शनासाठी विक्रमी गर्दी केली. शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून मोहटादेवी गडावरत भाविकांची पायी येण्यासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या एका बाजूने पूर्ण पायी चालणारे भाविक, तर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने जाणार्‍या दुचाकी व चार चाकी वाहनांनी पूर्ण रस्ता फुलला होता. नवरात्रोत्सवातील सातवी माळ व रविवारची सुट्टी एकत्रित आल्यामुळे मोहटादेवी मंदिरापासून ते पाथर्डी शहरापर्यंत ठीकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. अभूतपूर्व आा गर्दीपुढे सर्व प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली होती. पाथर्डी शहरातील वाहतूक कोंडी काढण्यासाठी स्वतः आमदार नीलेश लंके हे कोरडगाव चौकात रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. मोहटा गड परिसरातील मंदिराकडे येणारी सर्व मार्ग वाहतूक कोंडीने ठप्प झाली होती. या वाहतुकीच्या कोंडीला वैतागून भाविकांनी ज्या ठिकाणी मोकळी जागा मिळेल त्याच ठिकाणी रस्त्यातच गाड्या लावून पायी जात देवीचे दर्शन घेणे पसंत केले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाला सामाजिक कार्यकर्त्यांनी ही मदत केली.

प्रवासाने थकलेल्याा भाविकांची शनिवारी रात्री रस्त्यावर ठिकठिकाणी टोळक्यांनी रस्त्यावर बैठक टाकून विश्रांती घेतली. रस्त्यात ठिकठिकाणी विविध मंडळांनी व युवा नेत्यांनी भाविकांसाठी स्वागत कमानी उभारल्या होत्या .पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात घेऊन काही मंडळ वाजवत गडाकडे दर्शनासाठी जात होते. गावोगावच्या पालख्या मिरवत गडावर धडकत होत्या. सातवे माळयाच्या पूर्वसंध्येला गडाच्या पायथ्याला पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे परिसरातील डोंगरात मिळेल त्या ठिकाणी भाविकांनी विसावा घेतला. पाथर्डी शहरापासून मोहटा देवी गडापर्यंत शनिवारी रात्री संपूर्ण रस्ता भाविकांनी खचाखच वाहत होता. त्यामुळे चार चाकी व दुचाकींना प्रवासादरम्यान प्रचंड अडचण झाली. शनिवारी सायंकाळपासून धायतडकवाडी फाट्यापासून वाहतूक कोंडी पहावयास मिळाली.माहितीतील सर्व पार्किंग शनिवारी सायंकाळी फूल्ल झाल्या होत्या. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, सचिन लिंमकर, श्रीकांत डांगे, पोलिस पथकाने गड परिसरातील वाहतूक कोंडी सुरळीत केली.

मोहटादेवी मातेच्या गाभार्‍यात देवीच्या पूर्ण बाजूने रंगीबिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मोहटादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, कार्यालयीन प्रमुख भीमराव खाडे, संदीप घुले व देवस्थाने सुविधांसाठी प्रयत्न केले.

स्वयंसेवकांची अहोरात्र निष्काम सेवा
भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याने पोलिस प्रशासन हातबल झाले.पाचेगाव येथील स्वयंसेवक, स्वकाम सेवा आळंदी, बेलापूर कुलस्वामिनी मोहटा देवी भक्त मंडळ, राजू जाधव, श्रीरामपूर मित्र मंडळ, अनिरुद्ध बापू आपत्कालीन सेवा मंडळ, जनरक्षक सामाजिक संस्था, माऊली सेवाभावी फाउंडेशन सोलापूर, दक्ष पोलीस मित्र आष्टी अशा अनेक सेवाभावी मंडळांचे शेकडो स्वयंसेवक भक्तांच्या सेवेसाठी रात्रंदिवस राबत आहेत. सफाई कामगारांच्या मदतीने चोवीस तास मंदिर व परिसर स्वच्छ करण्यात येत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT